या महिन्यातील संग्रह व योजना Font Problem  

मराठी माणसाचं मराठीपण सिद्ध करायला पु.ल. प्रेमापासून ते पुरणपोळी प्रेमापर्यंतचे अनेक निकष लावता येतील. पण त्यातही साहित्य, संगीत आणि नाटक यावर तो मनापासून आणि श्रद्धेने प्रेम करत आलाय. त्यामुळेच साहित्य संमेलन असो, महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा असो, किंवा सवाई गंधर्व महोत्सव असो मराठी माणसाचा उत्साह एखादा सण साजरा केल्यासारखा ओसंडून वाहत असतो. पुढची पिढी सुद्धा याला अपवाद नाही हे विशेष. आणि म्हणूनच महत्वाचे !

ठराविक वेळी आकाशवाणी वर 'गीतरामायण' ऐकण्यासाठी काय, किंवा 'चिमणराव-गुंड्याभाऊंना' भेटण्यासाठी काय, अगदी आतुर झालेली तेव्हाची पिढी आणि कुमारांची एखादी चीज इंटरनेटवर सर्च करणारी आजची पिढी यात संदर्भ बदलले, माध्यमं बदलली एवढाच काय तो फरक! याबरोबरच, अभिरुचींचे मानदंडही बदलत असतांना, चांगल्या-वाईटाची जाण आणि भान मात्र बदलत चालले आहे, ही आज भेडसावणारी सगळ्यांत मोठी भीती. म्हणूनच, बालवयांत संस्कार करणारे, तरूण वयांत जिद्द आणि उत्साह निर्माण करणारे व उतारवयात विरंगुळा आणि मनाला आनंद देणारे साहित्य, आणि कलाकृती नेमक्या निवडून इंटरनेटच्या म्हणजे आजच्या काळातील सगळ्यात जवळच्या माध्यमातून प्रत्येक पिढी पर्यंत पोहोचाव्यात हा आमचा प्रयत्न आहे.

सातासमुद्रापलिकडे कुणा आजोबांना कवितेची तहान लागते, आणि 'आठवणीतल्या कविता' जन्माला येतात. मराठी साहित्य, संगीत आणि नाटकांचा हा समृद्ध ठेवा असाच सातासमुद्रापर्यंत पोहोचत रहावा यासाठी हा छोटासा प्रयत्न!

लवकरच नवीन कलाकृतींचा समावेश, ऑनलाईन खरेदी व पैसे भरण्याची सोय, मराठी साहित्य, संगीत, नाटक क्षेत्रातील घडामोडींची माहिती, आणखी बरंच काही...

या महिन्यातील संग्रह व योजना


  2005 © MarathiSahitya.com